• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवं शैक्षणिक धोरण हे भविष्याचा विचार करणार असलं तरी यामध्ये दोन त्रुटी जाणवतात – मनीष सिसोदिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळातर्फे काल मंजूरी देण्यात आली. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरीयाल निशंक यांनी माहिती देताना, ‘देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत कायापालट घडवून आणणाऱ्या सुधारणाचा मार्ग मोकळा करुन हा नव्या धोरणाचा उद्देश आहे.’ असं सांगितलं होत.

अशातच आता केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘देशाला गेल्या ३४ वर्षांपासून नव्या शैक्षणिक धोरणाची गरज होती. नवं शैक्षणिक धोरण हे भविष्याचा विचार करणार असलं तरी यामध्ये दोन त्रुटी जाणवतात.’

नव्या धोरणातील त्रुटींवर बोट ठेवताना सिसोदिया म्हणतात, ‘एक म्हणजे नवं शैक्षणिक धोरण हे जुन्या शिक्षण पद्धतीतील दबाव कमी करण्यात कमकुवत ठरेल असं वाटतंय तर दुसरं म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणात ज्या बदलांबाबत सांगितलं गेलंय, ते बदल घडवून आणण्यासाठी काय केलं जाईल, कोणत्या उपाययोजना राबवल्या जातील यावर प्रकाश टाकण्यात आला नाही. याबाबत गोंधळाचं वातावरण असल्याचं जाणवतं.’

दरम्यान, नव्या शैक्षणिक धोरणामध्ये 10 आणि 12 वी ची बोर्डाची परीक्षा कायम राहणार असून त्याचं स्वरुप बदललं जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाणार आहे. त्यासाठी सध्याचा 10 अधिक 2 हा आकृतिबंध रद्द करुन पाठ्यक्रम रचनेचा 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 असा आकृतीबंध या धोरणात दिले आहे. यामध्ये किमान पाचव्या इयत्तेपर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याच्या मूल्यांकन पद्धतीत देखील बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या शिकण्यातल्या प्रगतीचा माग ठेवला जाणार आहे. देशात संशोधन संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणात संशोधन क्षमता वाढवण्यासाठी नॅशनल रिसर्च फाऊडेशनची स्थापना केली जाईल.

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, त्यासाठी 2030 पर्यंत, शिकण्याच्या वयातल्या मुला-मुलींची शाळेत नाव नोंदणी शंभर टक्के करणे, तसेच, 2035 पर्यंत, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्याचे प्रमाण 50 टक्‍यांपर्यंत वाढवणे. हे या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये साडे 3 कोटी जागा वाढवल्या जाणार आहेत.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ७ हजार पेक्षा अधिक रुग्ण बरे

Next Post

बसपाच्या ६ बंडखोर आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बसपाच्या ६ बंडखोर आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon