जळगाव—- आज जळगाव जिल्हा एन एस यू आयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारींची माहिती महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांच्या कानी टाकली.
वाढीव बिलाच्या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे व या संपूर्ण प्रकारामुळे वीज ग्राहक त्रस्त झालेला आहे.
त्यामुळे वाढीव वीज बिलाबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा व 100 युनिट दरमहा इतके वीजबिल लाॅकडाऊनमधील काळातील तीन्ही महिन्यांचे माफ करावे, अशा प्रकारची मागणी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे केली.
यात म्हटले आहे कि , लाॅकडाऊनमधील तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्ष विज बिल घेण्याकरता ऊर्जा विभागाचे कर्मचारी लाॅकडाऊन असल्यामुळे येऊ शकले नाही व सरासरी विजेच्या वापरानुसार राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांना वीज बिले पाठवण्यात आली.
परंतु त्यामध्ये बहुसंख्य नागरिकांना विजेचा प्रत्यक्षात वापर न करता भरमसाठ प्रमाणामध्ये वाढीव बिल आल्यामुळे संपूर्ण वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
वीज ग्राहक वेळोवेळी आपल्या तक्रारी घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत परंतु वाढीव बिलाबाबत अजूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय ऊर्जा विभागाकडून अद्याप झालेला नाही व त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा एन एस यू आय कडे वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी दाखल करून, वाढीव वीज बिलाबाबत आवाज उठवण्याची मागणी केली व त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्हा एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांच्या कानी संपूर्ण महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी विषयी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली.
येणाऱ्या कॅबिनेट बैठकमध्ये वाढीव वीज बिलाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार ऊर्जा मंत्र्यांचा वीज ग्राहकांना दिलासा
वाढीव वीज बिलाच्या तक्रारींबाबत जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत यांनी सांगितले की येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वाढीव वीज बिलाबाबत वीज ग्राहकांना दिलासा देण्याकरता सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे .
त्यामुळे वीज ग्राहकांनी गोंधळून न जाता व महावितरण कार्यालयामध्ये गर्दी न करता घरातच राहावे व सुरक्षित राहावे महा विकास आघाडी सरकार व काँग्रेस पक्ष सदैव आपल्या सोबतच आहे.असे म्हटले आहे .