जळगाव;- येथील डॉ उल्हास पाटील डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये आजपर्यंत ९८६ रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला असून बहुतांश रूग्ण बरे होउन घरी गेले आहे.कोविड पॉझीटीव्ह रूग्ण व नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सेवा सूरू केली आहे.
डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार, व तज्ञ डॉक्टरांची टीम तसेच फिजीओथेरेपी तज्ञ, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, आशिष भिरूड, नर्सिंगचे प्रविण कोल्हे,संकेत पाटील, शिवा बिरादर यांचेसारखे अधिकारी रूग्णांच्या सेवेत तप्तर राहत आहे. याचबरोबर योगा, डाएट फुडस, ऑक्सीजन उपलब्धता करून देण्यात आली आहे.डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड पॉझीटीव्ह रूग्णांची माहिती होणार अपडेट. नातेवाईक राहतील रूग्णांशी कनेक्ट डॉ उल्हास पाटील डेडीकेटेड हॉस्पीटलने हेल्पलाईन सेवा सूरू वार्ड नं १ पॉझीटीव्ह वार्ड रूग्णांसाठी पंकज बोंडे ७२६१९००१००, अतिदक्षता विभाग व संदिग्ध नं २ व ३ वार्डातील रूग्णांसाठी ईश्वर जाधव ७२६१९००२००, तसेच वार्ड ४ व ५ पॉझीटीव्ह वार्ड निलेश वाणी ७२६१९००३०० तसेच ८७६७८२२९६६ या क्रमांकावर संपर्क साधल्यास रूग्णांची माहिती मिळू शकणार आहे. आजपर्यंत ९८६ रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला असून बहुतांश रूग्ण बरे होउन घरी परतले आहे. मिळाणा—या उत्तम सेवेमूळे रूग्णांचा या डेडीकेटेड हॉस्पीटल मध्ये दाखल होण्याचा आग्रह असतो. शिवचरीत्रकार दादा नेवे, नशिराबादचे ए पी आय कापडणीस, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, या सारख्या दिग्गजांनी देखिल येथे उपचार घेउन कोरोना मात केली आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी या हेल्पलाईन सेवेचा लाभ घेउन माहिती मिळवावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केेले आहे.








