साकळी ता.यावल (वार्ताहर) येथील माध्यमिक विद्यालय शिरसाड-साकळी या शाळेत संस्थेचे अध्यक्ष व जळगाव जि.प.चे शिक्षण ,आरोग्य व क्रिडा सभापती श्री.रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री के.एल. बडगुजर यांनी त्यांचा सत्कार केला . तसेच सत्कारार्थी श्री रविंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संध्या शिंदे, ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर माजी ग्रा.प.सदस्य दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन फन्नाटे,मिलिंद जंजाळे उपस्थिती होती.








