मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – इतर राज्यातील स्थिर शासन अस्थिर करणाऱ्या लोकशाहीविरोधी मोदी सरकार अर्थात भाजपा सरकारचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहेत ते अस्थिर स्वरूपात करून येनकेन प्रकारे ही सरकारे पाडण्याचा डाव सुरू केला असून हुकूमशाही मोदी सरकारने कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश ,यासारख्या राज्यांमधील लोकनियुक्त काँग्रेस सरकार पैसा व बळाच्या जोरावर पाडली असून त्याठिकाणी भाजपा विचारांचे किंबहुना भाजपाचे सरकार त्या ठिकाणी स्थापन करून हा प्रकार घटनाविरोधी आहे लोकशाही विरोधी आहे केंद्रातील भाजपा सरकार लोकशाहीचे हुकूमशाही परिवर्तन करून लोकशाहीची गळचेपी करीत आहे
राजस्थान मध्येही लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहे आमदारांची पळवापळवी सुरू आहे याकरिता राजस्थान विधानसभा अधिवेशन तातडीने बोलवावे फ्लोर टेस्ट लवकर करावी लोकशाही घटनात्मक संस्था आणि लोकनियुक्त सरकारान वरती भाजप करत असलेल्या अन्याया विरोधात देशातील प्रत्येक नागरिकाने आत्मचिंतन करण्याची गरज असून दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या लोकशाहीच्या हत्येविरोधात आवाज उठवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे याअनुषंगाने” स्पीक अप फोर इंडिया कॅम्पेन” या देशव्यापी ऑनलाईन हा कार्यक्रम प्रत्येक भारतीयाने राबवावा असेही निवेदनात म्हटले आहे
तसेच भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्वर्गीय अब्दुलजी कलाम साहेब यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव जिल्हा सचिव आसिफ खान जिल्हा उपाध्यक्ष सेल बि डी गवई युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखडे मीडिया सेल अध्यक्ष सादिक खाटीक ॲड कुणाल गवई सलीम मंत्री अतुल जावरे अनिल सोनवणे निलेश पाटील रोहिदास राठोड संजय धामोडे सोपान धनगर फिरोज शेख इरफान बागवान जुबेर अली आनंदा कोळी महेश खुळे अमोल जैन यासह पदाधिकारी उपस्थित होते







