जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फौंडेशन व नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड आक्टिविस्ट तर्फे ६० रोपांची लागवड गणेशवाडी, तुकारावाडी, जानकी नगर ,पांडे चौक व खोटे नगर भागात करण्यात आली. या मध्ये कडू लिंब, गुलमोहर, सिसम, सप्तपरणी, जांभूळ इत्यादी ६० वृक्ष रोपांचे लागवड करण्यात आले. या रोपांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून झाडांचे कुंपण लावण्यात आले आहे.
या वेळी लागवड साठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, अर्जुन भारुळे, उमाकांत जाधव, प्रीतम शिंदे, शिवम महाजन, राहुल ठाकूर व इतर यांनी परिश्रम घेतले.