●कोरोनामुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण
● बाहेरगावच्या भाविकांनी गावी येणे टाळले.
साकळी ता.यावल (प्रतिनिधी) – येथे खान्देशचे दैवत कानूबाईचा उत्सव पारंपारीक पारंपरिक पद्धतीने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षी घरोघर हा उत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. या उत्सवात नारळ व खणापासून कानबाई व राणूबाई यांच्या प्रतिमा साकारतात व तिची दाग- दागिने घालून सजावट करतात. तर सध्याच्या आधुनिक काळाच्या प्रवाहात या उत्सवात आकर्षकपणे व नाविन्यपूर्णतेने सजावट केली जाते. दरम्यान साकळी येथील प्रसिद्ध डॉ.व्ही.सी.वाणी यांच्याकडे पालखीत बसवलेल्या कानबाईचा आकर्षक देखावा करण्यात आलेला होता. या वेळी कानुबाईची विधिवत पूजा व महाआरती केली जाते व तिला रोटा चा नैवेद्य दाखविला जातो. तर यावेळी भाऊबंद मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. मात्र यंदाच्या कोरोनाच्या महामारीमुळे या उत्सवावर काहीशी निराशा जाणवत होती. या मुळे सर्वत्र सोशल डिस्टंसिंग ठेवतं व तोंडाला मास बांधून भाऊबंद नातेवाईकांनी या पूजेत सहभाग घेतला. लवकरात लवकर कोरोनाच्या महामारी पासून संपूर्ण मानव जातीची सुटका व्हावी व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी कानुबाई कडे प्रा