जळगाव (प्रतिनिधी) – धुळे कारागृहात शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भादवि कलम 302 तसेच धुळे शहर पोलीस स्टेशन भाग 5 119/2020 भादवि कलम 224 नुसार सुरेश घुमान पावरा वय 40 हा धुळे सब जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत असताना 22. 6. 2020 रोजी पहाटे दोन ते अडीच च्या सुमारास कारागृहातून पसार झालेला होता.
सदर आरोपी सुरेश गुमान पावरा हा जळगाव शहरात येणार असल्याची गुप्त माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापू रोहम यांच्या आदेशाने पीएसआय सुधाकर लहारे , सहा.फौज. नारायण पाटील , पोलीस हेडकॉन्स्टेबल रामचंद्र बोरसे, पोलीस नाईक परेश महाजन, पोका. दीपक शिंदे चापोना. प्रवीण हिवाळे यांच्या पथकाने सदर आरोपीस ममुराबाद बस स्टँड जवळील लाकडाच्या वखार येथून ताब्यात ताब्यात घेतले. त्यानंतर रिपोर्ट नुसार आरोपीला धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.







