गडचिरोली (वृत्तसंस्था) – गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची सुत्रे पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शासन
निर्णयामध्ये अंशत: बदल करण्यात आला होता. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

करोनाच्या संकटामुळे 15 एप्रिल रोजी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे आता पुन्हा पूर्वीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा सांभाळतील.
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सूचना जारी केली आहे. विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील. तर एकनाथ शिंदे हे गडचिरोली व्यतिरिक्त ठाण्याचे पालकमंत्री आहेत.
दरम्यान, कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याकडे असलेल्या भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाचा पदभारही त्यावेळी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांना देण्यात आला होता.







