जळगाव (प्रतिनिधी)- कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उद्योजक डॉ. के.सी.पाटील यांनी जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाला २५० बेड भेट दिलेत. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक दानशूर पुढे सरसावले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा कोरोनाचा उद्रेक हा वाढतच चालला आहे. कोवीड सेंटर हाऊस फुल्लचे झाल्याचे दृष्य दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील विशेष कोविड रुग्णालय येथे माजी नगराध्यक्ष पंडितराव उखाजी कोल्हे यांचे जावई तथा उद्योगपती डॉ. के.सी.पाटील यांनी २५० बेड भेट दिलेत. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . महान कार्याबद्दल डॉ.के.सी पाटील यांचे वैद्यकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन केले आहे. इतरांनी ही सामाजिक बांधिलकी दाखवत पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







