भुसावळ (प्रतिनिधी) – येथील श्रीराम नगरमध्ये किरकोळ वादातुन तुषार अनिल जंजाळे या तरूणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दि.६ जुन रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणी तुषार जंजाळे याच्या फिर्यादीवरून हल्लेखोर सुश्रुत विनोद झोपे (वय २७) विरूध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग ५,गुरनं. ५९९/२०२० भादवि.कलम ३०७, ३२६, ३२३,३४१,१४३, १४७,१४८,१४९ व ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्या पासुन सुश्रुत झोपे हा फरार होता.

दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेचे सुमारास भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागात सुश्रुत झोपे हा आल्याची गुप्त माहीती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोनि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे
सपोनि.अनिल मोरे, पोना.रविंद्र बि-हाडे,किशोर महाजन, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील,विकास सातदिवे,कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे,बंटी कापडणे यांनी तात्काळ तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले.







