नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आणखी एक व्हिडीओ जारी करून चीन प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. चीनला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही रूपरेखा नाही. ते सध्या केवळ आपली प्रतिमा बनविण्यामध्ये व्यस्त आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले कि, जर आपण चीनशी मुकाबला करण्यास सक्षम असू तरच तुम्ही कार्य करू शकाल. त्यांच्याकडून तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळू शकेल. मात्र, त्यांनी (चीन) जर आपली कमजोरी पकडली तर समस्या निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही स्पष्ट दृष्टिकोनाशिवाय चीनला मात देऊ शकत नाही. केवळ राष्ट्रीय दृष्टिकोन नव्हेतर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन पाहिजे आहे. बेल्ट आणि रोड प्रकल्पही निसर्गाच्या विरुद्ध आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.







