• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात घातापाती कारवायांसाठी दहशतवाद्यांना चीनकडून शस्त्रे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कलादन बहुआयामी प्रकल्प उडवण्यासाठी चीनने पुरवलेला शस्त्रसाठा म्यानमार-थायलंड सीमेवर जप्त करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी म्यानमारमधील दहशतवादी गटांना चिनी बनावटीची पुरवली जाणारी शस्त्रे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेची बाब बनली आहे. भारताच्या सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या रस्ते आणि अन्य विकास कामांना रोखण्यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरण्याचा कटही यामुळे उघड झाला आहे.

म्यानमार आणि थायलंड पोलिसांनी संयुक्‍त मोहीम राबवली होती. त्यातून चिनी शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी हा साठा बांगलादेश सीमेवरील राखीने प्रांतातील आर्कन आर्मी या दहशतवादी गटांना देण्यासाठी नेला जात असल्याचे तपासात स्पष्ट केले.
एके 46 रायफली, रणगाडाविरोधी भूसुरूंग, बॉम्ब आणि मशीनगन्सचा या शस्त्रसाठ्यात समावेश होता. ही शस्त्रे थायलंडमधील माइ सोत जिल्ह्यातील घरातून जप्त करण्यात आली. ही शस्त्रे आर्कन आर्मीकडून सध्या वापरली जात. ही सर्व शस्त्रे चिनी बनावटीची आहेत.

भारतीय लष्कर आणि म्यानमारच्या लष्कराने आर्कन आर्मीविरोधात गेल्यावर्षी संयुक्‍त शोधमोहीम राबवली होती. कलादन प्रकल्प सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सनराईज या नावाने ही मोहीम राबवली होती. मिझोरामशेजारील लॉनगतलाई जिल्ह्यात आर्कन आर्मीने अनेक तळ उभारले आहेत. त्यामुळे कलादन प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो. हा प्रकल्प भारताचे आग्नेय आशियातील गेट वे म्हणून ओळखला जातो.

थायलंड पोलिसांच्या प्रवक्‍त्याने बॅंकॉक पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा शस्त्रसाठा दहशत निर्माण करण्यासाठी आणला असावा. गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तो जप्त करण्यात आला

बांगलादेश आणि भारताच्या पूर्व भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी रोहिंग्या जिहादींची भरती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने केली आहे. लष्कर ए तोयबा आणि अक्वमूल मुजाहिद्दीन या संघटनात घनिष्ठ संबंध आहेत.

म्यानमारमध्ये भारतीय लष्कराचे अस्तित्व आहे. त्यामुळे तेथे चिनी हालचालींना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच भारताच्या कलादन प्रकल्पाला धोका निर्माण करण्यासाठी चीन दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवत आहे. भारताच्या ईशान्य भागातील बंडखोरांकडेही चिनी बनावटीची शस्त्रे आढळली आहेत. त्यावरून सीमावर्ती भागात भारत करत असलेल्या रस्ते उभारणी आणि अन्य विकासकामांना लक्ष्य करण्यासाठी चीन दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवत असल्याचे स्पष्ट होते, असे याबाबत अभ्यास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जप्त केलेला शस्त्रसाठा
39 एम 22 रायफल्स, 29 मध्यम मशीनगन्स, 69 एम21 रायफल्स, नऊ एम 16 रायफल, 21 आरपीजी, एक एफएन 6 हे जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र. ही सर्व शस्त्रे चीनमधून तस्करी करून आणण्यात आली होती.


 

 

Previous Post

ठाण्यातल्या हॉस्पिटल्सनी आकारली 27 लाखांची जादा बिले

Next Post

राजनाथ सिंह यांची फॉरवर्ड पोस्टला भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजनाथ सिंह यांची फॉरवर्ड पोस्टला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon