जळगाव (प्रतिनिधी) – पाळधी तालुका धरणगाव येथे संत सावता महाराजांची ७२५ व्या पुण्य स्मृती दिनानिमित्त पाळधी येथे सोशल डिस्टन्स चे पालन करत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथील श्री संत सावता महाराज मंदिर येथे सावता महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच चंदू माळी पाळधी नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती दिलीप पाटील ग्रामपंचायत सदस्य जीतू पाटील दिगंबर माळी संपादक भूषण महाजन पत्रकार गोपाळ सोनवणे या सह ईतर समाजबांधव उपस्थित होते.








