मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात आज (१७ जुलै) ८,३०८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २,२१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५४.८१ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.९१ टक्के एवढा आहे.
मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.







