नवी दिल्ली;- अनेक महिन्यांपासून कोर्टात रखडलेल्या मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत 3 ते 4 वेळा अंतरिम निर्णयावर दिलासा देण्यात आला आहे, त्यात अजून किती बदल करायचा, अशी विचारणा कोर्टाने केली आहे.
सुप्रीम कोर्टात आज चौथी सुनावणी पार पडली. मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात न्यायमूर्ती एन नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.
आज झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आणि याचिकाकर्त्यांना धारेवर धरले. आतापर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देत असताना 3 ते 4 वेळा दिलासा देण्यात आला. त्यामुळे यात अजून किती बदल करायचा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात यावर पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल, असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. पुढील सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येईल असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.
तसंच, या प्रकरणावर पुढील 27 जुलै रोजी सुनावणी होईल, तोपर्यंत सरकार आणि याचिकाकर्त्यांनी यावर किती वाद घालायचा आहे हे ठरवून घेतले पाहिजे, असंही न्यायमूर्तींनी दोन्ही पक्षांना बजावले.