बडोदा ;- स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिव्या देणाऱ्या शुभम मिश्राला बडोदा पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियावर अग्रिमा ट्रोल होत होती. इन्टाग्राम आणि टिकटॉकवर भरपूर फॉलोइंग असणाऱ्या शुभमने इन्स्टाग्रामवरच्या एका व्हीडिओत जाहीरपणे अग्रिमाचं नाव घेत बलात्काराची धमकी दिली.
सोशल मीडियावर शुभमचा हा व्हीडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर ‘नॅशनल कमिशन फॉर वुमन’ने गुजरात पोलिसांकडे विचारणा करत शुभमवर कारवाईची मागणी केली.कुणाल कामरा, स्वरा भास्कर यांच्यासह अनेकांनी पोलिसांना याची कल्पना दिली होती. बडोदा पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणाची दखल घेत 26 वर्षीय शुभमला रविवारी संध्याकाळी अटक केली.
कुणाल कामरा, स्वरा भास्कर यांच्यासह अनेकांनी पोलिसांना याची कल्पना दिली होती. बडोदा पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणाची दखल घेत 26 वर्षीय शुभमला रविवारी संध्याकाळी अटक केली.