जळगाव ;- शहरातील खिशतीया पार्क येथे हवेत गोळीबार करणाऱ्या चौघांच्या अवघ्या चार तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत . घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले ,अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके ,, सहाय्यक पोलास अधीक्षक निलभ रोहन यांनी घटनेचे गांभार्य पाहुन धटनास्थळी दाखल झाले होते . पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी डि.बी.पथकास सुचना दिल्या य वेगवेगळे पथक तयार करुन सदर फायरिंगप्रकरणी तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्यानुसार पोना अक्रम शेख ,पोना मणेश शिरमाळे , फार्यारग करणारे पैकी राजु उर्फ बाबु अशोक
सपकाळे ,रा. क्रांती चौक शिवाजी नगर जळगांव, मिलींद सनकत रा.गेदालाल मिल जळगांव यांना पकडून | त्यांचे कडुन समजले की राजु उर्फ बाबू अशोक सपकाळे, मिलीद सकट , मयुर उर्फ विकी दीपक अलोणे , इम्रान उर्फ इमू शहा रा. गेंदालाल मिल हे चौघे बियर पिट असताना दोन अज्ञात इसम तेथून जात असताना त्यांनी विकी अलोणे याला याबाबत जाब विचारला असता त्यांच्यामध्ये हाणामारी झाली . त्यावेळी विकीने बाटली पेऱ्कुन मारली असता भांडण सोडवण्यास आलेल्या सुफियान शाकिल बेग रा. शिवाजी नगर हुडको जळगांव यास उजव्या डोळयाचे खाली लागल्याने तो जखमी झाला .
यावेळी विक्की अलोणे याने त्याचे जवळ असलेल्या गावठी कटटयातुन हवेत दोन गोळीबार केले . याप्रकरणी पोलिसांनी आरोपी हा शिरसोली येथे असल्याचे माहिती पोना अक्रम शेख पोना सुधिर साळवे यांना मिळाली होती . त्यानुसार .पोलीस निरीक्षक अरुण निकम पोहेकॉ विजय निकुंभ,पोहेकॉ महेंद्र पाटील, गणेश पोकॉ/प्रणेश ठाकुर, पोकॉ/तेजस मराठे ,, योगेश इंधाटे , यांना रवाना केले . पथकाने रात्री ०२.०० वा.सु.शिरसोली रसत्यावर मयुर उर्फ विकी यांच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले तसेच वरील आरोपीना अटक केली . आरोपींविरुद्ध गुरन ११३/२० भादंवि कलम १८८,२६९,३२३,३३’५.३४ करन ३७ (१) (३) चे उल्लघंन कलम १३५ प्रमाणे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .







