मुंबई (वृत्तसंस्था) –कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने लोक त्यापासून वाचण्यासाठी मास्क खरेदी करत आहेत. लोक फेस मास्क, हँड सॅनिटायजर आणि टॉयलेट पेपर मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने, त्याची कमतरता भासवू लागली आहे. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत मास्क बनविण्याचा जुगाड सांगितला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये एक महिला सहज टिश्यू पेपरद्वारे मास्क बनवत आहे. हा मास्क कोणीही घरी बनवू शकते. महिला टिश्यू पेपरला दोन्ही बाजूला रबर लावून सहज मास्क बनवते व मास्क घालते.महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आता मास्कची कमतरता जाणवणार नाही ? आणि मला वाटायचे की केवळ भारतीयच जुगाड करण्यात मास्टर आहेत.