जळगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिरसोली येथील तुषार ज्ञानेश्वर बारी या २१ वर्षीय तरुणाने रविवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला दुपारी ४.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घेवून गेल्यावर तेथे त्याचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.कळस्कर यांनी पोलिसांना खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास नाईक नितीन पाटील व जितेंद्र राठोड करीत आहेत. तुषार शेतीकाम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र लगेच समजू शकले नाही.







