पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल गेल्या तीन महिन्यापासून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी covid-19 सेंटर म्हणून प्रशासनाने ताब्यात घेतले होते त्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही गेल्या तीन महिन्यापासून विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉक्टर भूषण दादा मगर दिवस-रात्र रुग्णांची सेवा करीत आहेत व आपल्या परीवारा पासुन कुटुंबापासून दूर आहे भडगाव रोड वरील हॉटेल्स स्वप्नशिल्प याठिकाणी वास्तव करत आहे फक्त रुग्णसेवा हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन सेवा करत आहे परंतु काही दिवसापासून विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल व डॉक्टर भूषण दादा मगर यांच्याबद्दल चुकीची माहिती चुकीचा संदेश जनतेमध्ये काही हितचिंतक पसरवत आहेत हॉस्पिटल बदनाम करीत आहेत प्रशासनाकडे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत या कारणाने येणाऱ्या दिनांक 03/07/2020 पासून पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविंड सेंटर बंद होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर भूषण दादा मगर यांनी दिली आहे








