रुग्ण संख्या झाली 29 वर ; 18 कोरोना मुक्त उपचार घेत आहे 11

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आता आलेल्या प्राप्त अहवालानुसार पुन्हा आज शिरसोली प्र.बो.मधील भाम विहीर परिसरात 1 रुग्ण तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .
आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या 29 वर जाऊन पोहचली आहे
शिरसोली प्र.न. 9 व शिरसोली प्र.बो. 9 असे एकुण 18 जण कोरोना मुक्त झाले आहे. तर 11 जणांनवर कोव्हीड हाँस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे.







