जळगाव (प्रतिनिधी) – ‘पोलिसांना बातम्या का देतो’ म्हणत शिवाजी नगरातील कानळदा रोड भागात एका बिअरशॉपीच्या मालकाला मारहाण केल्याची घटना घडली आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरीओम नगरातील योगेश गोपाळ साळी (वय-३२) यांचे खूशी बिअर शॉपी कानळदा रस्त्याला लागून आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास संशयित आरोपी टक्कल लोहार, संदीप ठोके (रा. लक्ष्मी नगर) यांनी पोलिसांना बातम्या का देतो? असे साळी यांना हटकले त्यानंतरच्या शाब्दिक बाचाबाचीमध्ये योगेश साळी यांना दोघांनि मारहाण करून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. योगेश साळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







