बुलडाणा अर्बनचा धनादेश स्वीकारताना रेड क्रॉस चे चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासणी, माजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अँडीशनल कलेक्टर गोरक्ष खाडिलकर, रेडक्रॉस चे उपाध्यक्ष गणी मेनन, मानद सेक्रेटरी . विनोद बियाणी, राजेश यावलकर, डों अपर्णा मकासरे, डॉ अनिल
शिरसाट, सुनील भंगाळे, सौं पुष्पा भंडारी आणि बुलडाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक . अविनाश पाटील

जळगाव (प्रतिनिधी) – अर्सनिक अल्बम 30 यां होमिओपॅथि गोळ्याची निर्मिती आणि वाटपसाठी बुलडाणा अर्बनतर्फे रेड क्रॉस सोसायटीला १५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश नुकताच देण्यात आला.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि शहरातील होमिओपॅथि तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विनामूल्य युनिटी बूस्टर वाटप (अर्सनिक अल्बम 30) करणे सुरु आहे. रेडक्रॉस चे कर्मचारी, स्वयंसेवक, शहरातील पोलीस , पेट्रोज पंपावर काम करणारे कर्मचारी, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, वाहतूक शाखेतील कर्मचारी, घंटागाडीवर काम करणारे वाहनचालक, सफाई कामगार व त्यांचे सहकारी यांना औषधी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 1,50,000 डब्या वाटप केल्या यापुढे जिल्ह्यात पाच लाख डबी तयार करून वाटप करावयाचे असल्यामुळे रेड क्रॉस सोसायटी यांनी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार पंधरा हजाराचा धनादेश रेडक्रोंस
सोसायटीचे प्रेसिडेंट व तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ठाकणे , अँडीशनल जिल्हाधिकारी गोरक्ष खाडिलकर यांना .बुलडाणा अर्बनचे खान्देश विभागीय व्यवस्थापक गोपालसिंह पाटील यांनी धनादेश प्रदान केला.
याप्रसंगी माजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अँडीशनल कल्रेक्टर गोरक्ष खाडिलकर, रेड क्रॉसचे चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासणी,
उपाध्यक्ष गणी मेनन, मानद सेक्रेटरी . विनोद बियाणी, राजेश यावलकर, डॉ अपर्णा मकासरे, डॉ अनिल शिरसाट, सुनील भंगाळे, पुष्पा भंडारी आणि बुलडाणा अर्बनचे अविनाश पाटील व मंगेश पाटील उपस्थित होते.






