रुग्ण संख्या झाली 28 वर ; 15 कोरोना मुक्त

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आता आलेल्या प्राप्त अहवालानुसार पुन्हा 1 रुग्ण तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .
आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या 28 वर जाऊन पोहचली आहे. शिरसोली प्र.बो. येथील आता एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
दरम्यान शिरसोली प्र.न. 6 व शिरसोली प्र.बो. 9 असे एकुण 15 जण कोरोना मुक्त झाले आहे. तर 13 जणांनवर कोव्हीड हाँस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे.
शिरसोली मध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसेन दिवस जास्त वाढत असुन याबाबत दोन्ही गावातील ग्रामपंचायत व नागरिक सात दिवस संपूर्ण शिरसोली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुसरा दिवस बंदचा सुरु असुन परंतु यासंदर्भात दुकाने बंद ठेवले असून बाहेर चौकाचौकात ४ ते ५ जणांचा ग्रुप करून बसत आहे. याकडे मात्र बंद पुकारणाऱ्या ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसत







