• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यंदा मुंबईचा राजा मंडळाची मूर्ती होणार छोटी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजा मंडळाने यंदाचा गणेशत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी विशाल मूर्ती ऐवजी छोटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंडळ आपल्या भव्य मूर्तीसाठी आणि आकर्षक सजावटीसाठी प्रसिद्ध आहे.

यंदा कोरोनाचे सावट गणेशोत्सवावरही पडताना दिसत आहे. मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा विशाल मूर्ती ऐवजी केवळ चार फुटांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचा राजा मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले की प्रशासनाच्या आदेशानंतर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीच उंची केवळ चार फूट ठेवणार आहे. यापूर्वी ही उंची २२ फुटांच्या आसपास असायची. तसेच यंदा मिरवणूक न काढता कृत्रिम तलावात गणपती विसर्जन केले जाणार आहे.

यापूर्वी मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या वडाळ्यातील जीएसबी मंडळ्याने २०२१ पर्यंत गणेशोत्सव स्थगित केला आहे. यंदा गणेशोत्सव न करतान माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांच्याकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली काही दिवसांपूर्वी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली होती. यात मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन केले होते. मूर्ती मोठ्या नको, मिरवणूक नको, जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम नको, नाच गाणे नको, मंडळात संख्या मर्यादीत हवी अशा सूचना केल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत मुंबईतील अनेक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.

मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया.

चर्चेत सहभागी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनीही आरोग्य शिबिरे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसेच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांचे नियोजन करू. मूर्तींच्या उंचीबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचे पालन केले जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.


 

 

Previous Post

महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

Next Post

ज्ञानेश्‍वरीतील शब्दसामर्थ्य शृंगार रसालाही जिंकणारे : हभप सुरेश महाराज सुळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्ञानेश्‍वरीतील शब्दसामर्थ्य शृंगार रसालाही जिंकणारे : हभप सुरेश महाराज सुळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon