मुंबई (वृत्तसंस्था) – सुपरस्टार रजनीकांत लवकरच राजकरणात एन्ट्री करणार आहे. ते एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. तसेच त्यांचा पक्ष आणि सरकार हे वेगवेगळं काम पाहणार आहेत. ते स्वत: पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती नसतील. तसंच जो पक्षाचा नेता असेल तो कधीच सरकारचा भाग नसेल. हा पक्ष तामिळनाडून बदल घडवेल, असंही त्यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं आहे.
रजनीकांत म्हणाले,’ डीएमके आणि एआयएडीएमकेचं नाव घेत त्यांनी लोकांना बदल हवा आहे. आपल्या पक्षात तरूणांना आणि उच्च शिक्षित लोकांना संधी देऊन तामिळनाडूत नवं नेतृत्व तयार करायचं आहे. म्हणूनच आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही नसू,’ गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूच्या राजकारणाची माहिती घेत असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं. डीएमके आणि एआयएडीएमकेचं नाव घेत त्यांनी लोकांना बदल हवा असल्याचंही म्हटलं. ‘आपल्या पक्षात तरूणांना आणि उच्च शिक्षित लोकांना संधी देऊन तामिळनाडूत नवं नेतृत्व तयार करायचं आहे. म्हणूनच आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही नसू,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांच्या ड्युअल प्लॅननुसार त्यांच्या पक्षात दोन विभाग असतील. एक विभाग पक्षाचं कामकाज पाहिल, तर दुसरा सरकारमधील कामकाज पाहणार आहे. आमचा पक्ष स्वत: सरकारला प्रश्न विचारेल. कोणतीही चुक झाल्यास संबंधितांविरोधात पक्ष कारवाई करेल. आमच्याशी जोडल्या गेलेल्या सदस्यांचा आम्ही योग्यरित्या वापर करू. आम्ही जे काही ठरवलं आहे, ते आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आम्ही नेते, पत्रकार आणि अधिकाऱ्यांशीही त्याबाबत चर्चा केली. परंतु त्यासाठी कोणीही तयार झालं नाही. परंतु आम्ही जे काही ठरवलंय त्यावरच आम्ही पुढे जाऊ,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.