• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसनविकार आणि कार्डियाक अरेस्टवर मात; २१ दिवसांच्या अथक उपचारानंतर पार्थ सुखरूप घरी

जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसनविकार आणि सेप्सिसमुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी आणि परिचारिका पथकाने अथक प्रयत्नांतून नवे जीवन दिले आहे. उपचारादरम्यान हृदय बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट), व्हेंटिलेटरची आवश्यकता आणि अनेक अवयव निकामी होण्याचा धोका अशा अत्यंत गंभीर परिस्थितीवर मात करत पार्थ रवींद्र नवघरे (वय १.५ वर्षे, रा. जामनेर) हा चिमुकला सलग २१ दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी परतला आहे.

जामनेर येथील पार्थ रवींद्र नवघरे याला तीव्र श्वसनविकार, गंभीर न्यूमोनिया, एन्सेफॅलोपॅथी, सेप्सिस आणि गंभीर रक्तक्षय (अॅनिमिया) झाल्यामुळे जामनेर उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते. त्यावेळी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत्या. बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने अनेक खासगी रुग्णालयांकडून उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार मिळाल्यानंतर अखेर पालकांनी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले.

रुग्णालयात दाखल करताना पार्थला श्वास घेण्यास तीव्र त्रास होत होता, तसेच झटकेही येत होते. त्याला तातडीने बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करून आवश्यक ऑक्सिजन व अतिदक्षता उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याला शॉक बसला. शुद्ध हरपल्याने त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. याचदरम्यान पार्थचे हृदय अचानक बंद पडले (कार्डियाक अरेस्ट). ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती; मात्र डॉक्टरांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता सीपीआर देऊन हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले. गंभीर रक्तक्षयामुळे त्याला रक्त संक्रमणही करण्यात आले.

आजाराची तीव्रता इतकी होती की त्याच्या यकृतावरही परिणाम झाला होता आणि अनेक अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाच्या प्रकृतीचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यक तपासण्या, प्रतिजैविकांमध्ये योग्य बदल, व्हेंटिलेटर व्यवस्थापन आणि इतर अतिदक्षता उपचार केले. डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण आरोग्यसेवकांच्या समन्वयातून उपचार सुरू ठेवण्यात आले.

या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आणि उपचारांच्या आठव्या दिवशी पार्थला व्हेंटिलेटरवरून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑक्सिजनची आवश्यकता कमी झाली आणि त्याची प्रकृती स्थिर होत गेली. अखेर सलग २१ दिवसांच्या उपचारानंतर पार्थ पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. या अत्यंत आव्हानात्मक उपचार प्रक्रियेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर आणि बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. गिरीश राणे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. कौस्तुभ चौधरी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. भावना पाटील, वरिष्ठ निवासी डॉ. गोकुळ बाविस्कर व डॉ. शुभम चौहान, कनिष्ठ निवासी डॉ. पवन रेड्डी, डॉ. महेश पाटील, डॉ. कृतिका पांडे, डॉ. योगिता तिडके आणि डॉ. हर्षवर्धन मोरे, डॉ. श्रद्धा चापके, डॉ. किरण मुंढे यांनी उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय पीआयसीयूच्या सिस्टर इन्चार्ज श्रद्धा सपकाळ व त्यांचे संपूर्ण परिचारिका पथक तसेच बालरोग वॉर्डच्या सिस्टर इन्चार्ज नीता दुसाने व त्यांचे संपूर्ण परिचारिका पथक यांनी रुग्णाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.

आपल्या चिमुकल्याची प्रकृती अत्यंत गंभीर असताना शासकीय रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाने घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्या मुलाला नवजीवन मिळाल्याची भावना पार्थच्या आई-वडिलांनी व्यक्त करत सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत एका चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या संपूर्ण बालरोग विभागाच्या पथकाने शासकीय आरोग्यसेवेतील समर्पण, कौशल्य आणि सेवाभावाचा एक आदर्श निर्माण केला आहे.

Tags: #dr.girish thakur news #gmc news jalgaon
Previous Post

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

Next Post

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी
क्राईम

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

November 27, 2026
मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!
खान्देश

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

November 27, 2026
जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!
जैन कंपनी

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव!

November 27, 2026
घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेच केली घरफोडी; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!
क्राईम

घरकामासाठी आलेल्या व्यक्तीनेच केली घरफोडी; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!

November 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

November 27, 2026
मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

मृत्यूशी झुंज देणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला ‘जीएमसी’ जळगावमध्ये मिळाले जीवदान..!

November 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!