
मुंदखेडे बुद्रुक शिवारातील पत्री शेडमधून शेळी लंपास; मध्यप्रदेशातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मुंदखेडे बुद्रुक शिवारात शेतातील पत्री शेडमध्ये बांधलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची शेळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल नोंदीनुसार, मुंदखेडे बुद्रुक शिवारातील गट क्रमांक ६२/३ मधील पत्री शेडमध्ये बांधलेली पांढऱ्या रंगाची, पाठीवर काळे ठिपके असलेली बकरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
याप्रकरणी भूषण संजय पाटील (वय ३२, व्यवसाय शेती, रा. मुंदखेडे बुद्रुक, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात देवराम त्रिशा लोहार (वय २५, रा. चौधरिया, ता. राजपूर, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याचे नाव आरोपी म्हणून नोंदविण्यात आले आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.








