• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केवळ दोन टाकून केलेली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

दुसर्‍याच दिवशी डिस्चार्ज, शासकीय योजनेतून मोफत उपचार

जळगाव : कंबरदुखीसह डाव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि बधिरपणामुळे चालणेही कठीण झालेल्या ४८ वर्षीय रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत केवळ दोन टाके घेण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पायातील ताकद वाढली, वेदना व मुंग्या पूर्णपणे थांबल्या आणि दुसर्‍याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
संबंधित ४८ वर्षीय पुरुष रुग्ण मागील एक महिन्यापासून कंबरदुखी आणि डाव्या पायात पसरणार्‍या तीव्र वेदनांनी त्रस्त होता. कंबरदुखीपेक्षा पायातील वेदना अधिक तीव्र होत्या. डाव्या पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे तसेच अवघे १०० मीटर चालल्यानंतर चालण्यास त्रास होणे, अशा तक्रारी होत्या. तपासणीमध्ये डाव्या पायातील स्नायूंची ताकद कमी झाल्याचे आढळले. विशेषतः घोटा आणि पायाच्या अंगठ्याची हालचाल करणार्‍या स्नायूंची ताकद ३/५ इतकी कमी झाली होती.एमआरआय लंबर स्पाइन तपासणीत एल ४-एल ५ आणि एल ५-एस१ या दोन मणक्यांमधील डिस्क सरकल्याचे ( पीआयव्हीडी प्रोलॅप्स्ड इंटरव्हर्टेब्रल डिस्क ) निदान झाले. त्यामुळे नसांवर दबाव निर्माण होऊन पायात वेदना, मुंग्या आणि स्नायूंची ताकद कमी होण्याचा त्रास होत होता.रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपिक डिकंप्रेशन, लॅमिनेक्टॉमी आणि डिस्केक्टॉमी (लॅमिनेक्टोमी आणि डिस्केक्टोमीसह एंडोस्कोपिक डिकंप्रेशन) ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे छोट्या छेदातून मणक्याच्या भागात पोहोचून नसांवरील दबाव कमी करणे आणि सरकलेली डिस्क काढणे शक्य झाले. शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके घेण्यात आले.ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अतुल जाधव यांनी केली.डॉ. श्रुती खंडागळे व डॉ. प्रीतम दास यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब—हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या डाव्या पायातील स्नायूंची ताकद वाढली. पायातील वेदना, मुंग्या आणि बधिरपणाचा त्रास थांबला. रुग्णाला चालण्यातही सुधारणा जाणवली. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने दुसर्‍याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.विशेष म्हणजे, या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. अत्याधुनिक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचा लाभ आर्थिक भाराविना मिळाल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला.लहान छेद, केवळ दोन टाके आणि जलद रिकव्हरी हे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, मणक्याच्या आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी आधुनिक उपचारपद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे. डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

Next Post

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!
क्राईम

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

November 20, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जैन कंपनी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केवळ दोन टाकून केलेली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 20, 2026
सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण
क्राईम

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

November 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; शस्त्रांसह पाच जणांना अटक!

November 20, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतरजिल्हा वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट निवड चाचणी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी

November 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!