प्रतिमापूजनानंतर कार्यालयाला कुलूप; संबंधितांवर कारवाईची मागणी
यावल ( प्रतिनिधी ) :- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी वड्री ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचा आरोप होत असून, आदिवासी समाजबांधवांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, प्रतिमापूजनानंतर उपस्थित नागरिक निघून गेल्यावर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयाला कुलूप कोणी लावले आणि प्रशासक व ग्रामसेवक कार्यक्रमाला अनुपस्थित का होते, असा सवाल उपस्थित होत आहे.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. अशा महत्त्वाच्या दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाची अनुपस्थिती गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी समाजबांधवांकडून होत आहे. आता वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










