पिंप्री खुर्द येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तुळशीराम परशुराम राठोड (वय ४४, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) यांची काळ्या रंगाची मोटारसायकल घराच्या अंगणात उभी होती. दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.
या प्रकरणी दि. १३ नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.









