गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव; केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहर व परिसरातील लेवागुर्जर, बडगुर्जर, दोडे गुर्जर, सूर्यवंशी गुर्जर व गोकुळवंशी गुर्जर समाजाच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वामी लॉन्स, पाचोरा येथे भव्य समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव व सन्मान सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



या सोहळ्याला केंद्रीय मंत्री मा. ना. रक्षाताई खडसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचे गौरव व सन्मान करण्यात आले.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य आणि संघटन अधिक बळकट करणे, शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे, कौटुंबिक मूल्यांचे जतन करणे तसेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
यावेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, नव्या पिढीला प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आणि समाजबांधवांनी एकजुटीने कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले, तर विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
समाजातील एकोपा, संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी एक सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.








