• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आमदार अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; यावल आगाराला मिळणार २५ नवीन बसेस!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल–भुसावळ महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांचा जीव धोक्यात!

यावलच्या एसटी सेवेला मिळणार नवी गती; विद्यार्थी, नोकरदार व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा, १५ वर्षांपासून रखडलेल्या बसस्थानक नूतनीकरणाचीही अपेक्षा

यावल ( प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, यावल एसटी आगाराला वर्षभरात टप्प्याटप्प्याने २५ नवीन बसेस उपलब्ध होणार आहेत. आमदार अमोल जावळे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे यावल आगाराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळून ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
यावल आगार हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या आगारांपैकी एक मानले जाते. येथून जळगाव, भुसावळ, रावेर, बहादरपूर, फैजपूर, पाल, चोपडा, अमळनेर, गिरडगाव, किनगाव, सावदा आदी विविध मार्गांवर एसटी बसेस धावतात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून जुन्या बसेसची संख्या आणि अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा बसेसअभावी प्रवाशांना फेऱ्या रद्द होण्याचा किंवा प्रवासासाठी प्रतीक्षा करण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून यावल आगारासाठी २५ नवीन बसेस उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदारांच्या प्रयत्नांचे प्रवासी संघटनेकडून स्वागत
यावल आगाराला २५ नवीन बसेस मिळणार असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले तसेच यावल प्रवासी संघटनेच्या वतीने आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे. नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांचा वेळ वाचून एसटी सेवेवरील विश्वास वाढण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आता यावल बसस्थानकाच्या नूतनीकरणाकडे लक्ष
एकीकडे २५ नवीन बसेस मिळण्याची आनंदाची बातमी असताना दुसरीकडे यावल बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बसस्थानकाच्या विकासाचा प्रश्न रखडलेला असून, स्वच्छतागृहांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, प्रवाशांसाठी आसनव्यवस्थेचा अभाव आणि निवारा शेडच्या समस्यांमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
यावल आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी ज्या पद्धतीने प्रभावी पाठपुरावा केला, त्याच पद्धतीने त्यांनी बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. बसस्थानकाला आधुनिक स्वरूप देऊन महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
२५ नवीन बसेसच्या माध्यमातून यावलच्या एसटी सेवेच्या विकासाला मिळणारी ही चालना निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असून, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. आता बसस्थानक नूतनीकरणाचा प्रश्नही त्यांच्या पुढाकारातून मार्गी लागावा, हीच यावलकरांची अपेक्षा आहे.

Tags: aa.javlenchya pathpuravyala yash
Previous Post

व्यासनगरी यावलमध्ये भक्तीचा जागर! श्री व्यासोनारायण भगवान यांना ५६ भोगांचा अन्नकूट अर्पण

Next Post

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!
जैन कंपनी

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026
यावल–भुसावळ महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांचा जीव धोक्यात!
खान्देश

आमदार अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; यावल आगाराला मिळणार २५ नवीन बसेस!

November 13, 2026
व्यासनगरी यावलमध्ये भक्तीचा जागर! श्री व्यासोनारायण भगवान यांना ५६ भोगांचा अन्नकूट अर्पण
Uncategorized

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026
यावल–भुसावळ महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांचा जीव धोक्यात!

आमदार अमोल जावळेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; यावल आगाराला मिळणार २५ नवीन बसेस!

November 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!