दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित
जळगाव (प्रतिनिधी) – पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनून कार्य करणाऱ्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संघटनेच्या सदस्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
या स्नेहमयी कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम आणि केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


याप्रसंगी दोन्ही केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संघटनेच्या सर्व सदस्यांना दिवाळीची गोड भेट म्हणून मिठाईचे वाटप करून दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत व्हावे आणि सणासुदीच्या काळात एकमेकांमधील बंधुभाव व आपुलकी वाढीस लागावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, आणि शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संघटनेचे सदस्य योगेश सुने, नितीन सोनवणे, संधीपाल वानखेडे, निखिल सोनार, पवन खंबायत, लालचंद अहिरे, जकी अहमद, वसीम खान,निखिल वाणी,विकास पाथरे,सुमित देशमुख, अभिजीत पाटील,योगेश चौधरी,रशिद बागवान, विकास चव्हाण, जगमोहन ठाकुर,अमोल पाटील,व शाहीर तेली, यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.









