अजिंठा चौफुलीवरील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


मध्यप्रदेशातील २५ वर्षीय विकाससिंग गुर्जरचा मृत्यू; एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : मध्यप्रदेशातील विकाससिंग गुर्जर (वय २५) या तरुणाने जळगावातील अजिंठा चौफुली परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विकाससिंग हा जळगावात असताना अजिंठा चौफुलीवरील एका लॉजमध्ये त्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.








