कानळदा येथे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले


ग्राम महसूल अधिकारी मालती चापले यांची धडक कारवाई; प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वाहन जप्त
जळगाव, प्रतिनिधी : अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. नांद्रा येथील ग्राम महसूल अधिकारी मालती चापले यांनी आज सकाळी 10 :45 वाजेच्या सुमारास कानळदा येथील राजारामनगरजवळ ही कारवाई केली. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर प्रशासकीय इमारतीच्या परिसरात जप्त करण्यात आले.
वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडण्यात आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









