• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ११ सौरऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण

जळगाव, ( प्रतिनिधी ) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावे, भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पाळधी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुगोकी लॉन्स येथे झालेल्या या शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाळधी आणि धरणगाव परिसरातील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मैदानी आणि लेखी परीक्षेचे मार्गदर्शन

शिबिरात जळगाव जिल्हा पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक तसेच अधिकारी व अंमलदारांनी उमेदवारांना मैदानी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. धावणे, शारीरिक चाचणी, विविध मैदानी प्रकार, नियमित व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसे करावे आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याची योग्य पद्धत कोणती, याची माहिती लिपिक कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण

याच कार्यक्रमात ग्रामपंचायत निधीतून बसविण्यात आलेल्या ११ सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्रणेमुळे गावातील महत्त्वाच्या ठिकाणांवर देखरेख ठेवणे शक्य होणार असून, गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांची सुरक्षितता वाढविणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.

‘आजची तयारी, उद्याचा पोलीस अंमलदार’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक युवक-युवतींना परीक्षेची तयारी करण्याची दिशा मिळाली. भरती प्रक्रियेविषयीच्या शंकांचे निरसन होऊन उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत झाली.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम

हे शिबिर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक राठोड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी, पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अली जाफर अली सैय्यद, पोहेकॉ मेघना जोशी, पोहेकॉ रज्जाक अली युनुस अली सैय्यद, पोहेकॉ संतोष सुरवाडे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहेकॉ अमित माळी, पोना किरण सपकाळे, मपोकों प्रियंका टिकारे, पोकों दिग्विजय दाभाडे, पोकों ज्ञानेश्वर पाटील तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विजय सोनवणे आणि सुनील निकम यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.


 

 

Tags: paldhit-polis-bharti-prashikshan news
Previous Post

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

Next Post

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon