• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीचा छडा; गुन्हे शोध पथकाची कारवाई

जळगाव, ( प्रतिनिधी ) : रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथे गोठ्यातून ४० हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याप्रकरणी रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.

संतोष देविदास पाटील (वय ४२, रा. शिंदखेडा, ता. रावेर) हे शेती व दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी व तीन म्हशी बांधलेल्या होत्या. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास गोठ्यातून गुरांचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले असता, तपकिरी रंगाची व मोठी शिंगे असलेली गाय गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे ४० हजार रुपये किमतीची ही गाय अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ मधील कलम ५ व ५ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून संशयितांची ओळख पटवली. चौकशीदरम्यान त्यांनी गाय चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख मुस्ताक शेख इसाक (वय ३८, रा. कुरेशी मोहल्ला, रसूलपूर, हल्ली मुक्काम मदिना कॉलनी, रावेर), शेख अक्रम शेख असलम (वय २५, रा. जुनी नगरपालिका समोर, इमामवाडा, रावेर) आणि शेख समीर शेख कलीम (वय २६, रा. मदिना कॉलनी, रावेर) यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ प्रमोद पाटील, पोहेकॉ विशाल पाटील, पोहेकॉ सुकेश तडवी, पोहेकॉ श्रीकांत चव्हाण, पोहेकॉ विकारोद्दीन शेख आणि पोहेकॉ योगेश पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

Next Post

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon