जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटातून अर्जुन पवार यांची उमेदवारी

शिरसोलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटातून शिरसोली येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन काशिनाथ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या पवार यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील ओबीसी गटातील राजकीय हालचालींकडे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष लीलाधर तायडे, दिलीप धनगर, किशोर भदाणे, बरकत अली, संभाजी पाटील, अमोल बाविस्कर, शांताराम ठाकूर, धीरज धनगर आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात उमेदवारांची अंतिम भूमिका आणि निवडणुकीतील राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.









