• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !

जळगावात बनावट मार्कशीट देऊन तरुणाची फसवणूक?

जळगाव (प्रतिनिधी) : बीएएमएस (आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपये घेतल्याची आणि त्यानंतर भारती विद्यापीठ, पुणे यांच्या नावाने कथित बनावट आयडी कार्ड व मार्कशीट दिल्याची तक्रार नशिराबाद येथील एका ३० वर्षीय तरुणाने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील ब्रुक बॉन्ड कॉलनी येथील अभिज्योत करिअर फोरमच्या संचालिका मनिषा अजय जोशी व त्यांचे पती अजय जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार पोलीसात देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी दिलेल्या आठ लाख रुपयांपैकी केवळ ७५ हजार रुपये परत मिळाले असून, उर्वरित सात लाख २५ हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचा दावा तक्रारदार मोहित रमेशराव येवले यांनी पोलिसांनकबे केला आहे.

मोहित येवले हे नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात राहतात. त्यांचे एम.फार्मसीचे शिक्षण झाले असून, मागील वर्षी नीट (NEET) परीक्षेत त्यांना १३० गुण मिळाले होते. बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची इच्छा असल्याने १४ जानेवारी २०२६ रोजी जळगावातील विद्युत कॉलनी परिसरात एका चहाच्या दुकानावर काही विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांना अभिज्योत करिअर फोरमची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ब्रुक बॉन्ड कॉलनी येथील कार्यालयात जाऊन संचालिका मनिषा जोशी व त्यांचे पती अजय जोशी यांच्याशी प्रवेशाबाबत चर्चा केली. डिम्ड विद्यापीठामध्ये बीएएमएस प्रवेशासाठी १० ते २० लाख रुपये खर्च येऊ शकतो, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर कमी खर्चात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.

२१ जानेवारी रोजी मोहित येवले पुन्हा कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे व पैसे घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार २७ जानेवारी रोजी ते मित्र खुशाल पांडे यांच्यासोबत कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी तीन लाख रुपये रोख आणि आवश्यक कागदपत्रे मनिषा जोशी यांच्याकडे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ४ व ६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी ५० हजार रुपये, तर ११ फेब्रुवारी रोजी आणखी ५० हजार रुपये संबंधितांनी पाठविलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन जमा केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे १ मार्च रोजी स्वतःकडील व वडिलांकडील जमा केलेले तीन लाख रुपये कार्यालयात रोख दिले. त्याच दिवशी आणखी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगण्यात आल्याने ती रक्कमही पाठविली. अशा प्रकारे बीएएमएस प्रवेशासाठी एकूण आठ लाख रुपये दिल्याचा दावा येवले यांनी केला आहे.

दरम्यान, १० मार्च रोजी कार्यालयात प्रवेश परीक्षेसाठी पेपर घेण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यानंतर २५ जून रोजी त्यांना व्हॉट्सॲपवर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे या नावाचे आयडी कार्ड पाठविण्यात आले. पुढे १९ ऑगस्ट रोजी ट्राय सेमिस्टरची मार्कशीट पाठविण्यात आली. मात्र, बीएएमएस अभ्यासक्रमात ट्राय सेमिस्टर नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर २० ऑगस्ट रोजी ‘BAMS Year-1’ असा उल्लेख करून सुधारित मार्कशीट पुन्हा पाठविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण कोणतीही परीक्षा दिलेली नसताना मार्कशीट पाठविण्यात आली. तसेच त्यावरील पीआरएन क्रमांक व इतर तपशीलांवरून आयडी कार्ड आणि मार्कशीट बनावट असल्याचा संशय आल्याचे येवले यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकारानंतर मोहित येवले यांनी संबंधितांकडे पैसे परत मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यावेळी ९ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे धनादेश वटले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, ऑनलाइन पद्धतीने केवळ ७५ हजार रुपये परत मिळाले असून, उर्वरित सात लाख २५ हजार रुपये अद्याप परत मिळालेले नाहीत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

१४ जानेवारी ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत बीएएमएस प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आठ लाख रुपये घेण्यात आले, त्यापैकी ७५ हजार रुपये परत करण्यात आले आणि उर्वरित रक्कम न देता कथित बनावट आयडी कार्ड व मार्कशीट देण्यात आली, असा आरोप मोहित येवले यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी अभिज्योत करिअर फोरमच्या संचालिका मनिषा अजय जोशी व त्यांचे पती अजय जोशी यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली असून, या प्रकरणातील आरोपांची पडताळणी व पुढील पोलीस कारवाईकडे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !
क्राईम

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान
खान्देश

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

व्हिडिओला पडले बळी : शेअरमध्ये ४ कोटी नफ्याचे आमिषापोटी झाली १३ लाख रुपयांत फसवणूक !

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

October 20, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon