स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांची कारवाई; अन्य आरोपींचा शोध सुरू
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यात तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या हसणेन शेख कुब्बद्दीन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी हजर करण्यात आले आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४४/२०२६ अन्वये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांशी संबंधित आरोपी हसणेन शेख कुब्बद्दीन याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रशांत सोनार, अशोक बाविस्कर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अन्य आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे.








