शेतकऱ्यांचे सुमारे २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत फिर्याद
अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर तालुक्यातील दहिवद शिवारात शेतातून इलेक्ट्रिक कॉपर वायरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत शेतकऱ्यांचे सुमारे २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, दहिवद तालुका अमळनेर येथील शेतशिवारात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरी झाली. शेतातील इलेक्ट्रिक कॉपरची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शेतातील वायर चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या चोरीप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत. चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.









