

जळगाव ( प्रतिनिधी ) – गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव शहरात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी बाके वाजवून दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.


या बैठकीत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांसंदर्भात ज्येष्ठ सल्लागार दिलीप तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी, “संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेला राज्य पातळीवर उच्च शिखरावर नेण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीस संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक कार्याध्यक्ष सागर ओतारी, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सचिव वसिम खान, जिल्हा संघटक अभिजित पाटील, जळगाव शहर उपाध्यक्ष पवन खंबायत व निखिल सोनार, शहर सचिव योगेश चौधरी, शहर संघटक भूषण हंसकर, शहर खजिनदार गोकुळ सोनार, जळगाव तालुका सचिव योगेश सुने यांच्यासह रशिद शेख ताबोळी, शाहीर तेली, महेंद्रसिंग ठाकूर, कल्पेश व्हिरोडकर, भूपेंद्र ठाकरे, अमोल चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








