जळगाव ;– नव्याने रुजू झालेलं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज मध्यरात्री अचानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड19 रूग्णालयास भेट दिली. रूग्णांना मिळत असलेले उपचार, औषधी व सुविधांची पाहणी केली. रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व स्टाफ यांच्या उपस्थितीची माहिती घेतली.यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती .








