शाडू मातीचा गणपती व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात श्री गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पाच दिवसांच्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणानंतर १८ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या गणपती बाप्पाला वाजत-गाजत आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.



गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणपती विसर्जनापूर्वी महाविद्यालयात आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने महाविद्यालयात शाडू मातीचा गणपती तयार करण्याची स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.शाडू मातीचा गणपती स्पर्धेतील विजेते :प्रथम क्रमांक — कीर्ती बोरोले व ग्रुपद्वितीय क्रमांक — शिवानी प्रजापती व ग्रुपतृतीय क्रमांक — शुभांगी लोहाररांगोळी स्पर्धेतील विजेते :प्रथम क्रमांक — काजल सोनवणेद्वितीय क्रमांक — नेहा पाटीलतृतीय क्रमांक — पूनम मोरेया स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. सरोज भोळे व प्रा. पूनम वाणी यांनी काम पाहिले.पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक काढली.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यानंतर मन्यारखेडा परिसरातील तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह उपस्थितांच्या मनात भावनिक वातावरण निर्माण झाले.गणपती विसर्जनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण गणेशोत्सवाचे नियोजन व आयोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रा. नकुल गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समितीतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिश्रम घेतले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावासोबतच सांस्कृतिक सहभाग, सर्जनशीलता, पर्यावरणपूरक विचार आणि संघभावनेची जाणीव निर्माण झाली. उत्साह, आनंद आणि भावपूर्ण वातावरणात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गणेशोत्सव संपन्न झाला.









