• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

९३ गावांसह यावल शहरातील १२ प्रभागांत दोन महिन्यांत ११,४४८ रुग्णांची तपासणी, १,०३९ शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, ( प्रतिनिधी ) :- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ या विशेष अभियानाला यावल तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

१० जून ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अभियानांतर्गत तब्बल ११ हजार ४४८ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली असून १ हजार ३९ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत यावल तालुक्यातील ९३ गावांमध्ये, तसेच यावल शहरातील १२ प्रभागांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी दूर जाण्याची गरज भासत नसून, वेळेत निदान व उपचाराची सुविधा त्यांच्या जवळच उपलब्ध झाली आहे.

११ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणीअभियानाच्या सुरुवातीपासून ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ११,४४८ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदू तसेच इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी २,९२२ रुग्णांना आयपीडीमध्ये दाखल करून उपचार देण्यात आले.मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत एकूण १,०३९ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे.गावोगावी पोहोचली नेत्रसेवाज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच उपचारापासून वंचित राहणार्‍या गरजू नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. गावोगावी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये केवळ मोतीबिंदूची तपासणी न करता विविध नेत्रविकारांची तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला देण्यात येत आहे.अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान वेळेत झाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे मोतीबिंदूमुळे होणारे टाळता येण्याजोगे अंधत्व रोखण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत आहे.तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरतया अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे डॉक्टर रुग्णसेवेत योगदान देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.अभियानाची ठळक कामगिरी ‡अभियान कालावधी : १० जून ते ७ सप्टेंबर २०२६गावे : ९३यावल शहर : १२ प्रभाग एकूण ओपीडी तपासणी : ११,४४८आयपीडीमध्ये दाखल रुग्ण : २,९२२ एकूण नेत्रशस्त्रक्रिया : १,०३९ आता पुढील अभियान चोपडा तालुक्यात होणार आहे


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

Next Post

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon