जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; १३ सप्टेंबरची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरातील चित्रा चौकासमोरील रोडवर उभी केलेली ३५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची अॅक्टिव्हा ४ जी दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश वसंतराव शर्मा (वय ७६, व्यवसाय व्यापार, रा. प्लॉट नं. १७०, जिल्हापेठ, चित्रा चौक, जळगाव) यांनी आपली होंडा कंपनीची काळ्या रंगाची अॅक्टिव्हा ४ जी दुचाकी एमएच १९ डीबी १३१७ ही १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान जिल्हापेठ चित्रा चौकासमोरील रोडवर उभी केली होती.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सदर दुचाकी चोरून नेली. दुचाकीची अंदाजे किंमत ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर सतीश शर्मा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ ४८१ विनोद भोळे करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.









