गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प


विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची स्थापना  

जळगाव  ( प्रतिनिधी ) – ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांतर्फे यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव असा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार गोदावरी हेल्थ सिटीसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तीमय वातावरणात आराध्य देवता गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. यावेळी बाप्पाच्या जयजयकाराने महाविद्यालयासह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
गोदावरी हेल्थ सिटी
गोदावरी हेल्थ सिटीअंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉ. युवराज आणि डॉ. पल्लवी बढे यांच्या हस्ते गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील, अधीष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, संचालक डॉ एन एस आर्विकर, डॉ. माया आर्विकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात रंगाची उधळण करीत बाप्पाच्या आगमनाचा विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे गणपती बाप्पांचे आगमन अत्यंत उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले.  स्थापना श्री. व सौ. मिलिंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आली. पुरोहित शैलेश नाईक यांच्या विधिवत पूजाविधीने गणेश स्थापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व आकर्षक स्वागत नृत्याने कार्यक्रमात उत्साह आणि चैतन्य निर्माण केले. या सोहळ्यास गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्नेहल जांभुळकर, मंजिरी मडावी, प्राजक्ता सावकार, सूरज खवाटे, सुमित भारंबे व  प्रेशित गायकवाड यांनी ७ व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेश आगमन व स्थापना सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय
महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची विधिवत पूजा व स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी

 डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत गणपती स्थापना सोहळा मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात  पार पडला. संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासन अधिकारी राहुल गिरी यांच्यासह फिजिओथेरपी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील यांनी उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून एकता, संस्कृती, संस्कार आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा उत्सव असल्याचे सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनीही मार्गदर्शन केले.


 

 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!