३९० किलो शिशाच्या धातूच्या विटांसह १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जळगाव, ( प्रतिनिधी ) : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत चोरी करणाऱ्या सहा आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या शिशाच्या धातूच्या विटांसह गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्या दरम्यान जळगाव एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टर येथील फिर्यादी लखन वासुदेव बुधाणी, रा. कंवर नगर, जळगाव यांच्या मालकीच्या श्री आनंद बॅटरी कंपनीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडला लागून असलेल्या जिन्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी कंपनीतील शिशाच्या धातूच्या विटा चोरी करून नेल्या.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक तपासातून सहा आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बबन आहाड यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक बबन आहाड यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलिक धनके तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले यात १) आसिफ शाह सिकंदर शाह, रा.तांबापुरा, जळगाव,२) मोहसिन शाह सिकंदर शाह, रा.तांबापुरा, जळगाव, ३) महेश उर्फ बापू संतोष भोई, रा. बिस्मिल्ला पोलिस चौकीजवळ, तांबापुरा, जळगाव,४) मुकेश राजू परमार, रा. गौतम नगर, तांबापुरा, जळगाव,५) शेख आबिद शेख महमद, रा. फुकट पुरा, तांबापुरा, जळगाव,६) शकील शाह ख्वाब शाह, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव.
चौकशीत चोरीची कबुली; मुद्देमाल हस्तगत
आरोपींकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जप्त मुद्देमालामध्ये १७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या विटा, एकूण वजन ३९० किलो, तसेच ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (गुन्हा करताना वापरण्यात आलेली) असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक बबन आहाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ मोतीलाल बोरसे, पो.अं. प्रदीप चौधरी, पोलीस नायक नितीन ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल ललित मारवे, पोलीस अंमलदार शशिकांत मराठे आणि पोलीस अंमलदार रमाकांत साळुंखे यांचा सहभाग होता.








